उसाची वाढ खुंटल्याने शेतकरी हवालदिल

उसाची वाढ खुंटल्याने शेतकरी हवालदिल
Published on: 

PNE26W55495
केवड : उसाची वाढ खुंटल्याने उसाची पाहणी व साखरेच्या प्रमाणाची तपासणी करताना बबनरावजी शिंदे शुगरचे ॲग्री अधिकारी विक्रम डोईफोडे.
---
दुष्काळाच्या झळा; उसावर नांगर
चारा म्हणून ऊस जनावरांच्या दावणीला; रिकव्हरी घटण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
उंदरगाव, ता. ६ : यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका ऊस पिकाला बसला आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे उसाची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. विहिरी अन् कूपनलिकांची पाणीपातळी घटल्याने उभ्या उसाला पुरेसे पाणी देणे शक्य होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी उसावर नांगर फिरवून फड मोडण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशुधन जगविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. कारखान्याला जाणाऱ्या उसाची वाढ समाधानकारक नसल्याने काही शेतकरी ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरत आहेत. काहींनी आगामी काळातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन ऊस राखून ठेवला आहे, तर काही ठिकाणी त्याची चारा म्हणून विक्री केली जात आहे.
उसाच्या कांड्यांची लांबी अन् जाडी कमी राहिल्याने उसातील रसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. कारखान्यांचे कृषी अधिकारी अन् कर्मचारी शेतात जाऊन ‘हँड रिफ्रॅक्टोमीटर’च्या माध्यमातून उसातील साखरेचे प्रमाण तपासत आहेत. दुष्काळामुळे अपेक्षित साखर उतारा (रिकव्हरी) मिळणार नसल्याचे संकेत असल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. ऊस उपलब्धता कमी होणे अन् रिकव्हरी घटणे, अशा दुहेरी संकटाचा सामना यंदा साखर उद्योगाला करावा लागू शकतो.
---
संपूर्ण ऊस अर्थव्यवस्थेवर परिणाम
उसाची आवक घटल्यास त्याचा परिणाम शेतकरी, साखर कारखाने, ऊसतोड मजूर अन् वाहतूकदार या संपूर्ण ऊस अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com