

मंचर, ता. २१ : ‘‘आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत पाच हजार २१७ खातेदारांच्या एक हजार १०७ हेक्टर क्षेत्रावरील तर जुन्नर तालुक्यात १२ हजार ९७ खातेदारांच्या आठ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण २५ टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही गतिमान पद्धतीने सुरू आहे,’’ अशी माहिती आंबेगाव-जुन्नर विभागाच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या पाच दिवसांत दोन्ही तालुक्यांतील सुमारे २५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित कामही प्राधान्याने गतिमान पद्धतीने करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील तूट आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन काम करत आहे. त्यानुसार महसूल विभागासह संबंधित यंत्रणांकडून बाधित पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्यासाठी पंचनाम्यांची नोंद महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. नियमितपणे पंचनामा प्रक्रियेचा आढावा प्रांत कार्यालयातून घेतला जात असून घोडेगाव तहसील कार्यालय व जुन्नर तहसील कार्यालयामार्फतही सक्षम यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.