

Students demand removal of restrictive conditions from the Maharashtra government's drought-related exam fee waiver scheme
esakal
पुणे, : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या परीक्षा शुल्क माफी योजनेत जाचक अटींचा अडसर निर्माण झाला आहे. शासन निर्णयातील अटी अत्यंत अन्यायकारक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या जाचक अटींमुळे आधीच दुष्काळाच्या आर्थिक संकटात सापडलेले अनेक गरजू विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता असून, राज्य सरकारने या अटी तत्काळ रद्द करून सरसकट परीक्षा शुल्क माफी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी केली आहे.