
पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने हडपसर आणि वाकडेवाडी परिसरात कारवाई करत पाच जणांना अटक केली. या कारवाईत सात लाख ८८ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार शहरात अमली पदार्थविरोधी कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील आठवड्यात बिबवेवाडी, कोंढवा आणि बुधवार पेठ परिसरात मेफेड्रोन आणि गांजा जप्त करण्यात आला होता.