
इंदापूर : लोणी देवकर गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला अटक करण्यात इंदापूर गुन्हे शोध पथकाला यश आले असून त्याच्याकडून चार किलो 160 ग्रॅम गांजा सह तब्बल दोन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पिक्या भानुदास काळे (वय 28 वर्ष रा.काटी ता.इंदापुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.