
बारामती - नगरपालिकेच्या घंटागाडीने शुक्रवारी (ता. 7) नागरिक व त्याच्या शाळेत घेऊन निघालेल्या मुलीच्या अंगावर गाडी घालून त्यांना फरफटत नेल्याने काही काळ नागरिक संतप्त झाले होते. संतप्त नागरिकांनी काही मिनिटे भिगवण रस्तो रोखून धरत या घटनेचा निषेध केला. मुख्याधिकारी वेळेवर न आल्यानेही संबंधित पालक देखील संतप्त झाले होते. विशेष म्हणजे नंबरप्लेटविना ही घंटागाडी चालवली जात असल्याचे समोर आले.