
पुणे : सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोरील १२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वाहन चालकाने मद्यपान केले होते. त्याला कार चालवता येत नाही, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.