मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यावर कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यावर कारवाई
Published on

लोणी काळभोर, ता. २१ : मद्यप्राशन करून बेदरकारपणे आयशर वाहन चालवून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील रिव्हरव्ह्यू सिटी रोडजवळ शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी जावेद अब्दुलरहिमान आवटे (वय ३४, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोणी पोलिस चौकीचे अंमलदार गणेश शेळके यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५४ वाजता डायल ११२ वर एका नागरिकाने रिव्हरव्ह्यू सिटी रोडजवळ एक व्यक्ती मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच मार्शल ड्युटीवर असलेले शेळके व होमगार्ड सुरवसे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित आयशर वाहन थांबविले.
चालक जावेद आवटे याची चौकशी केली असता, त्याच्या तोंडातून मद्याचा उग्र वास येत असल्याचे समोर आले. तो सार्वजनिक मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवत होता. त्यानुसार आवटे याच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com