Pune News : पुण्यात मद्यधुंद चालकाची वाहतूक उपायुक्तांच्या गाडीला धडक; दोन पोलिस जखमी

Police Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने दोन पोलिस जखमी झाले असून, चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Police Accident
Police Accident Sakal
Updated on

पुणे : वाहतुकीचे नियमन करण्यासाठी निघालेल्या वाहतूक पोलिस उपायुक्तांच्याच कारला भरधाव वेगातील मद्यधुंद कारचालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांना सुदैवाने इजा झाली नाही. शुक्रवारी (ता. १५) संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंढवा चौक परिसरात हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com