Wagholi News : दारूडा तणावात जेव्हा मोबाईल टॉवरवर चढतो; तीन तास खेळ, वाघोलीतील घटना, रेस्क्यू करण्यात अखेर यश

सायंकाळ ५.३० ची वेळ, एक दारूडा तरुण तणावात तीन मजली इमारतीच्या टॉवर वर चढला. तो वर चढल्याचे कळताच बघ्यांची गर्दी झाली. त्यातून वाहतूक कोंडी सुरू झाली.
Roshan Kumar

Roshan Kumar

sakal

Updated on: 

वाघोली - सायंकाळ ५.३० ची वेळ, एक दारूडा तरुण तणावात तीन मजली इमारतीच्या टॉवर वर चढला. तो वर चढल्याचे कळताच बघ्यांची गर्दी झाली. त्यातून वाहतूक कोंडी सुरू झाली. पोलिस व अग्निशमन जवान त्याला सतत उतरण्याचे आवाहन करीत होते. मात्र तो उतरत नव्हता. मोबाईलवरही त्याच्याशी संपर्क साधत होते. अखेर टॉवर वरच तो गुंगीत झोपला यानंतर पोलिस, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी टॉवर वर चढून त्याला खाली आणले. तीन तास हा खेळ सुरू होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com