दिवाळीत सुकामेव्याचा गोडवा; उत्पादन आणि आवक वाढल्याने दरात घट

यंदा सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आवक वाढली आहे.
Dry Fruits
Dry FruitsSakal

पुणे - यंदा सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा फायदा खरेदीदारांना आणि ग्राहकांना मिळत आहे. विविध प्रकारच्या सुकामेव्यात १० ते २५ टक्क्यापर्यंत दर उतरले आहेत.

दरवर्षी दिवाळीनिमित्त संस्था, संघटना, कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट देत असतात. तसेच मित्र आणि नातेवाईकही एकमेकांना मोठ्या प्रमाणात दिवाळी भेट देत असतात. बाजारात सध्या विविध प्रकारच्या सुट्ट्या आणि पॅकींग सुकामेव्याला मागणी वाढत आहे. मागणी वाढली असली तरी आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने दरात यंदा घसरण झाली आहे. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष दिवाळीला सुरूवात होईपर्यंत मागणी कायम असणार असल्याचे व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

Dry Fruits
महागाईने कंबरडे मोडले; शेतीचे तुकडे झाल्यामुळे बैल सांभाळणे झाले कठीण

बदाम, काजू, अंजीर, जर्दाळू, अक्रोड आणि पिस्ता, मनुका, जर्दाळूच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने दर घटले आहेत. सुकामेव्याचे दर कमी झाल्याचा फायदा दिवाळीत सामान्यांना होणार आहे. त्यामुळे यंदा विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुकामेव्याचे बॉक्स खरेदीवर लोकांचा भर वाढला आहे. आता कॉर्पोरेट क्षेत्रातही सुकामेव्याचे बॉक्स भेट स्वरूपात देण्याचा कल देखील वाढला आहे. यंदा परवडणाऱ्या किंमतीत ग्राहकांना खरेदीची संधी असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांचे नुकसान

सुकामेव्यात विविध प्रकारचा माल परेदशातून मागवावा लागतो. त्यामुळे एक ते दीड महिना आधी माल मागविला जातो. यंदा माल आल्यानंतर दर कमी झाले आहेत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

येथून होते आवक -

- बदाम - कॅलेफॉर्निया , ऑस्ट्रेलिया

- मॉमेरोन बदाम - इराण

- काजू - गोवा, कर्नाटक, कोकण, केरळ

- मनुके - सांगली

- पिस्ता - इराण, इराक,

- खारा पिस्ता - इराण, अमेरिका, कॅलेफॉर्निया

- अक्रोड - अमेरिका, चीली, भारताच्या काही भागातून

-अंजीर - इराण, अफगाणिस्तान

- बेदाणा - अफगाणिस्तान, भारत

पॉइंटर -

- सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात

- मालवाहू कंटेनर सहज उपलब्ध

- बाजारात आवक जास्त

- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आयात वाढली

Dry Fruits
तळेगाव ढमढेरे : आमदारांना पत्राद्वारे धमकी दिल्याबद्दल निषेध मोर्चा

बाजारात दिवाळी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी भेट देण्यासाठी पॅकींग मालाला मागणी वाढत आहे. बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवाक जास्त आहे. तसेच यंदा हवामान चांगले असल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणावर निघाले आहे. त्यामुळे सुकामेव्याचे दर कमी झाले आहेत.

- विनोद गोयल, न्यू सच्चा सौदा, मार्केट यार्ड

सुकामेवा एक किलोचे दर

प्रकार - सप्टेंबर - १८ ऑक्टोंबर

बदाम - ९६० - ६८०

पिस्ता - ९१० - ८६०

अक्रोड - ९०० - ८७०

काजू - ७०० - ६८०

अंजीर - ८८० - ७४०

जर्दाळू - ३२० - २८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com