Pune NewsSakal
पुणे
Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता
Road Safety : धायरीतील वडगाव खुर्द येथे रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वाळलेल्या झाडामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, स्थानिकांनी झाड हटवण्याची तातडीची मागणी केली आहे.
धायरी : वडगाव खुर्द येथील प्रयेजा सिटी सोसायटीकडून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या वाळलेल्या झाडाच्या बुंध्यामुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा धूसर हवामानात हे झाड लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. यामुळे ते हटविणे गरजेचे आहे.

