esakal | ईडीने जप्त केलेल्या DSK यांच्या बंगल्यात चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

DSK

ईडीने जप्त केलेल्या DSK यांच्या बंगल्यात चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात चोराने डल्ला मारला आहे. याप्रकरणी भाग्यश्री कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फसवणुकप्रकरणी मागील चार वर्षांपासून डी.एस.कुलकर्णी तुरुंगात आहे. त्यांच्या अटकेनंतर ईडीने सप्तशृंगी हा बंगला जप्त केला होता. या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास सात लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याची तक्रार भाग्यश्री कुलकर्णी यांनी केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top