
सहवीज निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने को-जनरेशन ऑफ इंडियामार्फत राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार (नॅशनल को जनरेशन अवॉर्ड्स) जाहीर करण्यात आले.
पुणे - सहवीज निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने को-जनरेशन ऑफ इंडियामार्फत राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार (नॅशनल को जनरेशन अवॉर्ड्स) जाहीर करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याला द्वितीय आणि सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास तृतीय पुरस्कार जाहीर झाला.
येथील साखर संकुल येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, दूधगंगा वेदगंगा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह अन्य साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
पारितोषिक वितरण २७ ऑगस्टला सकाळी दहा वाजता मुंबईतील एअरपोर्ट रोडवरील ललित हॉटेल येथे होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार आणि केंद्रीय सहसचिव बायोमास दिनेश जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहकारी आणि खासगी क्षेत्रासाठी कमी व जास्त दाब असणाऱ्या बॉयलर आधारित प्रकल्पाकरिता स्वतंत्र पारितोषिके देण्यात येतील, असे खताळ यांनी सांगितले.
राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार प्राप्त प्रकल्पांची नावे (जास्त दाब बॉयलर आधारित सहकारी प्रकल्प) : प्रथम- श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री (ता. कागल) कोल्हापूर, द्वितीय- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सांगली, तृतीय - विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर.
(कमी दाब बॉयलर आधारित सहकारी प्रकल्प) : प्रथम- श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सोलापूर, द्वितीय- चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी कर्नाटक, तृतीय - श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कोल्हापूर.
(जास्त दाब बॉयलर आधारित खासगी प्रकल्प) : प्रथम- दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज युनिट श्री दत्त कोल्हापूर, द्वितीय- पोन्नी शुगर्स नमक्कल तमिळनाडू, तृतीय - गंगाखेड शुगर अँड एनर्जी परभणी.
उत्कृष्ट को-जनरेशन व्यवस्थापक : नवनाथ सपकाळ (डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सांगली), सचिन विभूते (श्री पांडुरंग कारखाना सोलापूर), मुर्गप्पा हट्टीकल (निरानी शुगर कर्नाटक, बागलकोट), प्रवीण गुरड्डी (इआयडी प्यारी बागलकोट, कर्नाटक).
बेस्ट इन्स्ट्रुमेंटेशन व्यवस्थापक : अजित माने (विठ्ठलराव शिंदे कारखाना सोलापूर), स्वस्तिक उपाध्ये (श्री सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर), समीर यासीन सय्यद (श्री पांडुरंग साखर कारखाना सोलापूर), मनीष कुमार अग्रवाल (दालमिया भारत शुगर कोल्हापूर).
बेस्ट डीएम प्लांट व्यवस्थापक : बिपीन घाटोल (पूर्णा सहकारी साखर कारखाना हिंगोली), प्रकाश देशमुख (पतंगराव कदम सोनहिरा कारखाना सांगली), सत्यवान जाधव (श्री पांडुरंग कारखाना सोलापूर) पुरुषोत्तम सिंग (दालमिया भारत शुगर शहाजहॉंपूर उत्तर प्रदेश).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.