देशात चिनी ॲपवर बंदी घातल्याने रोपोसो, मित्रो, चिंगारी ॲपला पसंती

अक्षता पवार
Wednesday, 1 July 2020

देशात चिनी ॲपवर बंदी घालण्यात आल्याने नेटकऱ्यांनी आता स्वदेशी चळवळ उभी केली आहे. टिकटॉकसारख्या इतर ॲपवर कॉमेडी, भावनिक, नृत्याचे व्हिडिओ टाकून लाखो ‘फॉलोवर्स’ मिळविणारी ही मंडळी पहिल्या दिवशी विविध पर्यायी ॲप्लिकेशनकडे वळाली आहेत. यात रोपोसो, मित्रो, चिंगारी ॲप आघाडीवर आहेत.

पुणे - देशात चिनी ॲपवर बंदी घालण्यात आल्याने नेटकऱ्यांनी आता स्वदेशी चळवळ उभी केली आहे. टिकटॉकसारख्या इतर ॲपवर कॉमेडी, भावनिक, नृत्याचे व्हिडिओ टाकून लाखो ‘फॉलोवर्स’ मिळविणारी ही मंडळी पहिल्या दिवशी विविध पर्यायी ॲप्लिकेशनकडे वळाली आहेत. यात रोपोसो, मित्रो, चिंगारी ॲप आघाडीवर आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात टिकटॉक, हॅलो, यूसी ब्राउझर आणि शेअरइटसह ५९ चिनी ॲपवर सोमवारी बंदी घालण्यात आली. यातील टिकटॉक हे ॲप मनोरंजनाचा एक चांगला पर्याय म्हणून देशात मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. या ॲपच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोचणे शक्‍य झोले. तसेच, अनेकांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, टिकटॉक बंद होणार असल्याची माहिती मिळताच काहींनी निर्णयाचे स्वागत करीत हजारो फॉलोवर्सला गमाविण्याचे दुःख शेवटच्या व्हिडिओमधून दर्शविले. तसेच त्यांनी इन्स्टाग्राम, रोपोसो, मित्रो, चिंगारी आणि यू-ट्यूब चॅनेलवर फॉलो करण्याचेही आवाहन केले.

‘लॉकडाउनच्या काळात टिकटॉकचा वापर करण्यास सुरुवात केली होती. माझी नृत्य अकादमी आहे आणि या ॲपच्या माध्यमातून मला देशभरात माझी कला पोहोचविणे शक्‍य झाले. पण, आता पुन्हा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूब चॅनेलचा पर्याय निवडावा लागत आहे.
- भरत सऊद, नृत्य प्रशिक्षक, फ्लाइंग स्टेपर्स

‘हॅलो’ ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ, मिम्ससारख्या गोष्टी शेअर करणे सोपे होते. परंतु, आता इन्स्टाग्रामचा वापर करणार आहे. 
- प्रतीक जावडे, मिम्स ग्रुप पुणेचे अव्हेन्जर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the ban on Chinese app in the country, Roposo, Mitro, Chingari app is preferred