पुणे शहरातील हॉटेल, मेस, खाणावळी बंद असल्याने शेतमालाला उठाव कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्यांची आवक झाली.  चांगल्या दर्जाच्या कोथिंबिरीचे भाव चढेच होते. मेथीची २५ हजार जुड्यांची आवक झाली.

मार्केट यार्ड - बाजारात फळभाज्यांची आवक हळूहळू वाढत आहे. मात्र शहरातील हॉटेल, मेस, खाणावळी बंद असल्याने शेतमालाला उठाव कमी आहे; तसेच शहरातील अनेक ठिकाणच्या भाजी मंडई सुरू नसल्यामुळे भाज्यांना मागणी कमी होत आहे. 

बटाटा, टोमॅटो आणि शेवग्याच्या भावात वाढ झाली; तर सातारी आल्याच्या भावात घट झाली. अन्य भाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मार्केट यार्डात रविवारी 
सुमारे १०० ट्रक शेतमालाची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातहून तीन ट्रक कोबी, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून ५  टेम्पो गाजर, हिमाचल  प्रदेशातून ५ टेम्पो मटार, बंगळूरहून १ टेम्पो टोमॅटो, कर्नाटकातून २ टेम्पो तोतापुरी कैरी, आग्रा इंदूरहून २१ ट्रक बटाटा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची ८ ट्रक आवक झाली. 

कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्या
मध्यंतरीच्या पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्यांची आवक झाली. त्यात ६० टक्के कोथिंबीर दुय्यम दर्जाची होती. चांगल्या दर्जाच्या कोथिंबिरीचे भाव चढेच होते. मेथीची २५ हजार जुड्यांची आवक झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुलांची वाढतेय आवक
फुलबाजार सुरू झाल्यानंतर आवक हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत बाजारात आवक जेमतेमच होत असून, मागणीही तुलनेने कमीच आहे. त्यामुळे दर टिकून असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र गुलछडी, लिलीच्या फुलांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीताफळाच्या भावात घट
मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सीताफळाची आवक वाढल्याने भावात २० टक्‍क्‍यांनी घसरण झाली; तर कलिंगड आणि खरबुजाची आवक घटल्याने भावात वाढ झाली. लिंबे, संत्रा, मोसंबी, अननस आणि पपई, प्लम, पीच, डाळिंब, चिकू आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to closure of hotels messes in city the rise in agricultural commoditie less