भजी तर महागलीच; मटण थाळी 400 रुपये होणार?

चिंचवडगाव - खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने ग्राहकांची संख्या रोडावली.
चिंचवडगाव - खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने ग्राहकांची संख्या रोडावली.

कांद्याच्या भाववाढीचा परिणाम; ग्राहकांची हातगाडीकडे पाठ
पिंपरी - कांदाभजी... गोलभजी... खेकडाभजी... वडापाव... भेळ... मिसळपाव... पावभाजी... कांदेपोहे... अशा चटकदार पदार्थांचा सुगंध दरवळला की खवैयांची पावले आपसूकच हातगाडीकडे वळतात. मात्र, सध्या कांद्याच्या वाढत्या भावामुळे या चटपटीत पदार्थांसह चिकन आणि मटणाची थाळीही खवैयांसाठी महागली आहे.

हातगाड्यांसह हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय हा कांद्यावरच अवलंबून असल्याने ही दरवाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. हॉटेलमधील पंजाबी व महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी ही कांदा ग्रेव्हीवरच अवलंबून आहे. सध्या चिकन आणि मटण सहाशे रुपये किलो आहे. त्यात कांद्याने उच्चांकी पातळी गाठल्याने मटण आणि चिकनची थाळीही ४०० रुपयांपर्यंत महागण्याची चिन्हे आहेत.

हातगाड्यांवरील भजी महागली
कांदा दीडशे रुपये किलो झाल्याने हातगाडीचालक चिंतित झाले आहेत. सध्या खेकडा, गोल व कांदा भजी प्लेट ३० रुपयांपर्यंत आहे. हातगाडीचालकांनी एका प्लेटमागे पाच ते सात रुपयांची वाढ केली आहे. तर मिसळ ७० रुपये तर पावभाजी ९० रुपयांपर्यंत पोचली आहे. मात्र, छोट्या व्यावसायिकांनी किरकोळ पदार्थ विक्रीत दरवाढ केल्यास ग्राहकाचा हातगाडीकडे कल कमी होईल, अशी त्यांना भीती आहे. काही हातगाडीचालकांनी अद्याप दरवाढ केलेली नाही. पण कांद्याच्या किमती कमी न झाल्यास जानेवारीपासून हॉटेलसह हातगाडीवरील पदार्थांच्या भावात वाढ होणार असल्याचे चिंचवड येथील हातगाडीचालक प्रशांत आगज्ञान यांनी सांगितले.  

भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी 
 
हॉटेल व्यवसायावर परिणाम 
प्रत्येक थाळीच्या ताटाला कांदा हा लावलाच जातो. मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी थाळीतून कांदा गायब केल्यास याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत आहे. कांद्याच्या ठिकाणी कोबीचा वापर सध्या काही व्यावसायिक करत आहेत. कांद्याचे दर कमी न झाल्यास नवीन वर्षात प्रत्येक थाळीच्या किमतीत वाढ होणार आहे. पदार्थांची गुणवत्ता ही कांद्यावरही अवलंबून असल्याचे चिंचवड येथील हॉटेल व्यावसायिक रूपेश धुमाळ यांनी सांगितले. सोशल मीडियावर कांद्याचे दर वाढल्याने युजरनी कांद्याचे विविध विनोदी व्हिडिओ अपलोड केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com