इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमुळे चिखलीमध्ये एकाला बेदम मारहाण

Instagram-logo
Instagram-logo
Updated on: 

पिंपरी : इन्स्टाग्रामवर एका शाळकरी मुलीने महेश भट्ट या तरुणाला टॅग केले. हा टॅग काढण्यासाठी सांगितल्यावर चौघांनी महेशच्या भावालाच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. १०) रात्री चिखलीत घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

नायर, हेमंत सोनार, सुनिल सोनार, ललित सोनार (रामनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनिष महेंद्र भट्ट (वय 25, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिष यांचा भाऊ महेश भट्ट (वय १९) याला त्याच्या शाळेतील एका मुलीने इन्स्टाग्रामवर टॅग केले. मात्र, महेश याने त्या मुलीला फोन करून टॅग काढून टाकण्यास सांगितले. या कारणावरून चार जणांनी महेश याचा शोध घेतला असता, तो न मिळाल्याने त्याचा भाऊ मनिष याला दुकानात शिरून लाथाबुक्क्यांनी व फायटरने बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Aspirants Continue Their Protest in Pune While Demanding an Inquiry Into the Commission Chairman
Patient Reportedly Falls from Moving Ambulance at YCM Hospital
MPSC Student Agitation
A lump of ice weighing over 15 kg fell from the sky into a farm.
Marathi News Esakal
www.esakal.com