शिवाजी रस्ता बंद केल्याने प्रवाशांचे हाल; पीएमपीलाही 35 लाखांचा फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे सुमारे दोन लाख प्रवाशांचे मंगळवारी हाल झाले. तसेच पीएमपीएमएलच्या उत्पन्नालाही सुमारे 35 लाख रुपयांचा फटका बसला.

पुणे : शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे सुमारे दोन लाख प्रवाशांचे मंगळवारी हाल झाले. तसेच पीएमपीएमएलच्या उत्पन्नालाही सुमारे 35 लाख रुपयांचा फटका बसला.

शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते म्हणून वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील वाहतूक सकाळपासून बंद केली. त्यामुळे पीएमपीच्या बस डेक्कनवरून टिळक रस्तामार्गे पुढे गेल्या. शिवाजी रस्त्यावरून पीएमपीची वाहतूक बंद करू नका, अशी विनंती वाहतूक पोलिसांना वारंवार करण्यात आली होती, असे पीएमपीचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुचाकी आणि चार चाकी वाहनांची वाहतूक पोलिसांनी बंद करून पीएमपीची सुरू ठेवावी, अशीही मागणीही पोलिसांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Shivaji road close 35 lakh loss for PMP

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: