Pune : केंद्रामुळे जनतेची महागाईत होरपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule

केंद्रामुळे जनतेची महागाईत होरपळ

पुणे : ‘‘महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, त्यांच्या विरोधी भाष्य करणाऱ्यांचा केंद्र सरकार सन्मान करत आहे. केंद्र सरकारच्या कारभारामुळे सामन्य जनता महागाईत होरपळत आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आर्थिक परिणाम सहन करावा लागत आहे,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

घोटावडे (ता. मुळशी) येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पीएमआरडीच्या निवडणुकीत विजयी झालेले मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुखदेव तापकीर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, तालुकाध्यक्ष महादेव, ज्येष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे, राजेंद्र हगवणे, शांताराम इंगवले, आदी उपस्थित होते.

यावेळी सुळे म्हणाल्या, ‘‘मुळशी तालुक्यात पक्षाची स्थिती भक्कम आहे. पीएमआरडीच्या निवडणुकीत सुखदेव तापकीर यांच्या विजयाने ते दाखवून दिले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.’’

loading image
go to top