Jejuri Fort
Jejuri FortSakal

Jejuri Gad: जेजुरीगडावर रंगला मर्दानी दसरा; सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

Jejuri Gad: मंदिर प्रदशिक्षणा सुरू असताना ग्रामस्थांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली

Jejuri Gad: सनई चौघड्यांचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतीषबाजी... कलावंतांची हजेरी.. विद्युत रोषणाई अन्‌ उत्साही वातावरणात भंडाऱ्याची उधळण करत
कडेपठारच्या डोंगरातील रमन्यात मध्यरात्री तीन वाजता देवभेट सोहळा पार पडला. जेजुरी गडावर (ता. पुरंदर) कडेपठारच्या डोंगररांगांना जागविणाऱ्या मर्दानी दसऱ्याची अठरा तासानंतर सांगता झाला.

गडावरील खंडोबाची पालखी व कडेपठारची खंडोबाची पालखी यांची दसऱ्यानिमित्त डोंगरातील रमणा परिसरात देवभेट सोहळा असतो. त्यासाठी खांदेकरी कसरत करीत डोंगरदऱ्यातून पालखी भेटीसाठी आणतात. म्हणून दसरा मर्दानी दसरा म्हणून ओळखला जातो. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक व ग्रामस्थ रमणा परिसरात जमतात.

पेशव्यांनी इशारा देताच मंगळवारी सायंकाळी सहा वाजता देताच पालखीचे जेजुरी गडावरून प्रदान झाले. यावेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, मुख्य विश्वस्त
पोपटराव खोमणे, विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, विश्वासराव पानसे, अनिल सौंदाडे, पांडुरंगजी थोरवे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

मंदिर प्रदशिक्षणा सुरू असताना ग्रामस्थांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली. पालखी मंदिराच्या मुख्य दरवाजातून पूर्वेकडच्या बाजूने सुसरटिंगीवर आठ वाजता दाखल झाली. कडेपठारची पालखीचे नऊ वाजण्याच्या सुमारास प्रस्थान झाले.

गडावरची पालखी रमन्यात तर कडेपठारची पालखी डोंगरावर आल्यानंतर आरशामध्ये देवभेट सोहळा तीन वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर साडेतीन वाजता आपटापूजन झाले. त्यावेळी शोभेच्या दारूची व फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.

यावेळी सुमारे पंधरा हजार भाविकांची डोंगरात गर्दी झाली होती. यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, गणेश आगलावे, सुभाष राऊत, सुशील राऊत, माऊली खोमणे, सुधीर गोडसे, कृष्णा कुदळे, छबन कुदळे, काशिनाथ मोरे, प्रशांत सातभाई, दत्ता बारभाई, बाळकृष्ण दिडभाई आदी उपस्थित होते. दरम्यान, रमन्यात संतोष खोमणे यांनी खांदेकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

पालखीचे रांगोळी काढून स्वागत

कडेपठारावरील पालखी कडेपठार मंदिराकडे मार्गस्थ झाली. तर गडावरची पालखी हनुमान मंदिर, जुनी जेजुरी, नगरपालिका चौकातून महाव्दार रस्त्यावर आणण्यात आली.

Jejuri Fort
Share Market Closing: सलग पाचव्या दिवशी बाजार घसरला, गुंतवणूकदारांचे 14.60 लाख कोटींचे नुकसान

पालखीचे नगरपालिकेपासून महाव्दार रस्त्यावर नागरिकांनी फुलांच्या पायघड्या व रांगोळी काढून स्वागत केले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता पालखी गडावर आली. गडावर मंदिरप्रदक्षिणा घेऊन रोजमारा (धान्य) वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली. दोन्ही देवसंस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याचे चांगले नियोजन केल्याचे यावेळी गणेश आगलावे यांनी सांगितले.

Jejuri Fort
Bank Holidays November 2023: सणासुदीत बँकांना असणार 'एवढ्या' दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

कलावंतांचा देवसंस्थानच्या वतीने सन्मान

रात्रभर पालखीपुढे शोभेच्या दारूची आतीषबाजी, सनई वादन व कलावंतांची हजेरी सुरू होती. नंदा सातारकर, लता कुडाळकर यांच्यासह अनेक लोककलावंतांनी पालखीपुढे हजेरी लावली. कलावंतांचा देवसंस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला. डिखळे, भालेराव, राऊत, माळवदकर, झगडे, खोमणे, खान, घोणे, शिंदे, सातभाई, बारभाई, दीडभाई, मोरे आदी काही परिरावाच्या वतीने परंपरेनुसार मानानुसार सोहळ्यात सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com