

वाहनांच्या खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी
दुचाकींना मागणी; काही चारचाकींना वेटींग
पिंपरी, ता. १८ ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर आल्याने नागरिकांनी रविवारी (ता. १८) सुट्टीचा मुहूर्त साधत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी केली होती.
दसऱ्याचा मुहूर्त साधत अनेकजण वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यावर्षी दसरा मंगळवारी (ता.२०) आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची पसंती असते. पण, वाहनांना नंबर मिळण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे मुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी नागरिक अगोदरपासूनच बुकिंग करतात. दसऱ्यापूर्वीचा शेवटचा सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी नागरिकांनी वाहनांचे बुकिंग करण्यासाठी शहरातील विविध शोरूममध्ये गर्दी केली होती. वाहन खरेदीसाठी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी यंदाही वाहन विक्रेत्यांकडून आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या.
चारचाकी वाहनांना वेटिंग
बाजारात दुचाकी वाहने उपलब्ध असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे बुकिंग करताना दिसून येत होते. पण, काही चारचाकी वाहनांचे एक ते तीन महिन्यांचे वेटिंग असल्याने नागरिकांची निराशा झाली. पण, दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहन घेऊन जाण्यासाठी नागरिक वाहनांचे आताच बुकिंग करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दुचाकी वाहनाच्या चौकशीसाठी शोरूममध्ये आलो होतो. कोटेशन दिले आहे. पण, अजून कोणती दुचाकी घ्यायची हे अंतिम झालेले नाही.
- अनिकेत माळी, ग्राहक
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांची मागणी वाढली आहे. अनेकांनी मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाण्यासाठी अगोदरच वाहनांची नोंदणी केली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.
- मनीष मोहिते, संचालक, जय माता दी ग्रीन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.