बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ

बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ

पुणे - ‘लॉकडाउन’मध्ये स्वच्छ झालेली पुण्यातील हवा आता ‘अनलॉक’मध्ये पुन्हा प्रदूषित होऊ लागली आहे. शहरातील धूलिकणांचे प्रमाण पाच पटीने वाढले आहे.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मार्चपासून देशात लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक, विमानांची उड्डाणे, रेल्वे, बांधकामे यातून पुण्यासह राज्यातील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले होते; पण गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील शहरांमध्ये पुन्हा प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्मेंट’ (सीएसई) अभ्यासातून निघाला आहे. या संस्थेने महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, चंद्रपूर आणि सोलापूरमधील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे निष्कर्ष 

  • पुण्यातील अतिसूक्ष्म धूलिकणाचे (पीएम २.५) प्रमाण पाचपटीने वाढल्याची बाब नुकतीच संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत पीएम २.५ चे प्रमाण हे सरासरीच्या तुलनेत कमी झाले आहे. मात्र अनलॉकनंतर तसेच हिवाळ्यात आता या घटकांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 
  • या अभ्यासानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरात सर्वाधिक पीएम २.५ चे (४५ प्रतिघन मीटर) प्रमाण आढळून आले. तर सर्वाधिक जास्त अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण हे सर्वाधिक बृहन्मुंबई येथे असल्याचे या अभ्यासातून समजले आहे.  
  • लॉकडाउनदरम्यान पीएम १० बरोबर पीएम २.५ चे प्रमाणसुद्धा कमी झाले होते; परंतु हिवाळा सुरू झाल्याने एकूणच पीएम १० मधील पीएम २.५ टक्केवारीसह एकंदरीत दोन्हींची पातळी वाढली आहे.

एक, दोन, तीन, चार; नो हॉर्न बार बार

अशी होते हवा प्रदूषित
हवेत २.५ हे अतिसूक्ष्म आणि पीएम १० हे सूक्ष्म धूलिकण हवेत तरंगत असतात. रस्त्यावरील धूळ, बांधकामे यातून हे धूलिकण हवेत पसरतात. हे कण श्‍वसनातून थेट फुफ्फुसाच्या आतमध्ये जातात. त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात या समस्यांची तीव्रता वाढते.

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेने उचलली पावले

Edited By - Prashant Patil

loading image
go to top