द्वारकाधीश मंदिरातील पुष्टी सेवा

द्वारकाधीश मंदिरातील पुष्टी सेवा
Published on

PNE26W45875 -
सोलापूर : जलकमलवत् निर्मळ भक्तीचा संदेश देणारा कमलपत्री छटेतील कच्छी भरतकामाचा हिंडोला.

अहंकार प्रभूचरणी अर्पण करून जलकमलवत् निर्मळ भक्ती करा
द्वारकाधीश मंदिरातील दोन दिवसांच्या हिंडोल्यातून भक्तांना अनोखा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० : वैभवाचा अहंकार प्रभूचरणी अर्पण करून मनापासून श्रीकृष्णाची जलकमलाप्रमाणे निर्मळ भक्ती करा, असा पुष्टिमार्गीय भक्तीभाव द्वारकाधीश मंदिरातील दोन दिवसांच्या हिंडोला सेवेतून उलगडला. शुक्रवारी (ता. २८) रत्नजडित व फुलांचा हिंडोला, तर शनिवारी (ता. २९) कमलपत्री छटेत कच्छी भरतकामाचा हिंडोला साकारण्यात आला. फुलांच्या नयनरम्य आरासीत सजलेले हे दोन्ही हिंडोले भक्तांच्या मनाला आणि डोळ्यांना सुखावणारे ठरले. त्यासोबतच भक्तीच्या माध्यमातून भगवंतप्राप्ती कशी करता येते, याचे मर्मही उलगडले.
रत्नजडित हिंडोल्यातून जीवनात मिळालेले वैभव, संपत्ती आणि ऐश्वर्य हे अहंकाराचे कारण न बनवता श्रीठाकुरजींच्या चरणी समर्पित करावे, असा संदेश देण्यात आला. भगवंताच्या सेवेत अर्पण झालेले वैभवच खऱ्या अर्थाने सार्थक होते, हा भाव यातून व्यक्त झाला.
शनिवारी कमलपत्री छटेत साकारलेल्या कच्छी भरतकामाच्या हिंडोल्यातून निर्मळ भक्तीचा भाव अधोरेखित झाला. जलात राहूनही कमळ ज्याप्रमाणे अलिप्त आणि निर्मळ राहते, त्याप्रमाणे संसारात राहून मन भगवंताशी जोडून ठेवावे, असा संदेश यातून देण्यात आला. पुष्टिमार्गातील प्रेममय सेवा, समर्पण आणि भगवंताशी जिव्हाळ्याचे नाते या दोन्ही हिंडोल्यांतून भक्तांना अनुभवता आल्याचे मंदिराचे किशन मुखिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com