Coronavirus : कोरोनाबाबत आता अजित पवार यांनीही केलं आवाहन!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

- कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे.

बारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या संकटसमयी गर्दी टाळून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच तातडीची गरज भासल्यास रक्तपेढीमध्ये सर्वच गटांचे रक्त उपलब्ध असणे गरजेचे आहे, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे आवाहन केले आहे. बारामतीतही अनेक रक्तदात्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीवर जाऊन आज रक्तदान केले.

दरम्यान, संकटसमयी बारामतीकर एकजूटीने मदतीसाठी पुढे येतो याचेच आज उदाहरण या निमित्ताने दिसले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dy CM Ajit Pawar Appeal to Donate Blood