पुणे : डीनची बदली, डेप्युटी डीन आजारी आता 'ससून'ला वाली कोण?

पुणे : डीनची बदली, डेप्युटी डीन आजारी आता 'ससून'ला वाली कोण?
Updated on

पुणे : डाॅ. अजय चंदनवाले यांच्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदाची धुरा संभाळणारे उपअधिष्ठाता डाॅ. मुरलीधर तांबे अचानक शुक्रवारी आजारी पडले. त्यामुळे या पदाचा कार्यभार अस्थिरोग विभागाचे प्रमुख डाॅ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे सोपविण्याता आला आहे. 

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे डाॅ. चंदनवाले यांची गुरुवारी रात्री तडकाफडकी बदली केली. त्यांच्या बदलीचे आदेश रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालय प्रशासनाला मिळाले. पुण्यात कोरोना विषाणूंचा वेगाने फैलाव होत असतानाच या उपचाराचे प्रमुख केंद्र असलेल्या ससून रुग्णालयाच्या प्रमुखांची अशा प्रकारे तातडीने बदली झाल्याने गुरुवारी रात्रीपासूनच महाविद्यालयातील कर्मचारी आणि रुग्णालयातील डाँक्टर तीव्र संताप होता. 

डाॅ. चंदनवाले यांची बदली मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालक पदावर करण्यात आली. त्यामुळे अधिष्ठाता पदाचा कार्यभार डाॅ. तांबे यांच्याकडे देण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार डाॅ. चंदनवाले शुक्रवारी सकाळी कार्यमुक्त होण्यासाठी ससून रुग्णालयात गेले. मात्र, त्यावेळी डाॅ. तांबे आजारी पडल्याने कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे डाॅ. शिंत्रे यांच्याकडे अधिष्ठाता पदाची सूत्रे डाॅ. चंदनवाले यांनी सोपवली. 

डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची गर्दी

अधिष्ठाता पदाची सूत्रे देण्यासाठी डाॅ. चंदनवाले कार्यालयात येताच ससून रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने महाविद्यालयाजवळ जमला. सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com