सिंहगडावरील ई-बस सेवा पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून बसचा मुहूर्त लांबणीवर
E-bus passengers
E-bus passengerssakal

पुणे: पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या सिंहगड किल्ल्यावर सुविधा वाढविण्याच्या तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने वनविभागातर्फे पर्यटकांसाठी ई-बसे सेवा या २६ जानेवारीपासून सुरू होणार होत्या. मात्र अद्याप ई-बसचा मुहूर्त लांबणीवर गेला आहे. दरम्यान पुढील आठवड्याभरात सिंहगड किल्ल्यावर प्रस्तावित असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) ई-बस सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पुणे वन विभागातर्फे देण्यात आली आहे.

E-bus passengers
अकोला : बोलेरो पिकअपच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यू

पीएमपीच्या बस पार्क करण्यासाठी आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात आली असून याबाबतचा सामंजस्य करार देखील अंतिम टप्प्यात आहे. या बाबी लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष बससेवा सुरू होणार आहे. सिंहगड किल्ल्यावर प्रवाशांना गोळेवाडीतून जाता यावे, यासाठीची ई- बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा सामंजस्य करार तयार करण्यात येत होता. वनविभाग आणि पीएमपी असा दोन्ही आस्थापनांकडून त्यात बदल सुचविण्यात आले होते. त्यानंतर त्याचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांनी पीएमपीच्या बसने किल्ल्यावर जाता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा आदींनी पीएमपीच्या ई- बसमधून १ ऑक्टोबर २०२१ रोजी सिंहगडावर दौरा केला. पीएमपीच्या ताफ्यातील ई- बस सिंहगडाचा घाट प्रवासी घेऊन पार करू शकते, हे त्यावेळी स्पष्ट झाले. त्यानंतर २६ जानेवारी रोजी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही.

E-bus passengers
पुणे : भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सात ते आठ हजार पर्यटक हजेरी लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. सिंहगडावरील गाड्यांच्या रांगा कोंढणपूरपर्यंत जात असल्याने पर्यटक तासन् तास कोंडीमध्ये अडकत होते. या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी वारंवार होत असल्याने वन विभागातर्फे बसची व्यवस्था करण्यात येत आहे.

‘‘सिंहगडावर ई-बसद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपीची तयारी पूर्ण झाली आहे. वन खात्याने नियोजन केल्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येईल.’’

चेतना केरूरे, सहव्यवस्थापक संचालक (पीएमपी)

‘‘बसच्या पार्किंगची जागा निश्चित झाली असून त्याबाबतचे इतर काम अंतिम टप्प्यात आहे. गडावर असलेल्या चार्जिंग पॉईटची जागा देखील ठरविण्यात आली आहे. यासाठी पीएमपीसोबतच्या सामंजस्य कराराबाबत सध्या काम सुरू असून लवकरच त्यावर सह्या होतील. या सर्व प्रक्रीया येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष बस सुरू होणार आहे.’’

राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com