बाणेगाव येथे ई-पिक पाहणी कामकाजाची निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

बाणेगाव येथे ई-पिक पाहणी कामकाजाची निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
Published on

PNE26W46572 - ई-पिक पाहणी कामकाजाची पाहणी करताना निवासी उपजिल्हाधिकारी व इतर कर्मचारी.

बाणेगाव येथे ई-पिक पाहणी कामकाजाची
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करताना येणाऱ्या अडचणींची केली पडताळणी; महसूल यंत्रणेला आवश्यक सूचना

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ०२

बाणेगाव येथे ई-पिक पाहणी (डीसीएस) कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केली. सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची पडताळणी करून ई पीक पाहणीचे काम अत्यंत प्रभावीपणे करण्याच्या सूचना केल्या. यावेळी ई-पिक पाहणी प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांकडून पीक नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या तसेच आवश्यक मार्गदर्शन याबाबत माहिती घेण्यात आली. ई-पिक पाहणीची नोंद अचूक व वेळेत होणे महत्त्वाचे असल्याने महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्याकडून देण्यात आल्या.

यावेळी नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, पीक पाहणी सहाय्यक, पोलीस पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-पिक पाहणीचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची नोंद करताना पिकांची माहिती अचूकपणे नोंदवावी आणि काही तांत्रिक अथवा अन्य अडचण उद्भवल्यास संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची अचूक माहिती शासनाच्या अभिलेखात उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि महसूल यंत्रणेचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com