सीबीएसईचे विद्यार्थ्यांसाठी ई-क्‍लास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

बारावीसाठी मंडळाने ऑनलाइन तासिका सुरू करण्याचा अर्थात ई-क्‍लासचा पहिलाच प्रयोग आहे. सध्या काही शाळांमध्ये सकाळी दोन वर्ग ऑनलाइन घेतले जातात. काही शाळांनी आठवडाभराचे वेळापत्रक तयार केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनापूर्वी काही अभ्यास करण्यास दिला जातो.

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) ई-क्‍लासचा पर्याय निवडला असून त्याद्वारे शिक्षक अध्यापन करत आहेत. यासंदर्भात सर्व शाळांना हा प्रयोग करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पुण्यातही हा उपक्रम सुरू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारावीसाठी मंडळाने ऑनलाइन तासिका सुरू करण्याचा अर्थात ई-क्‍लासचा पहिलाच प्रयोग आहे. सध्या काही शाळांमध्ये सकाळी दोन वर्ग ऑनलाइन घेतले जातात. काही शाळांनी आठवडाभराचे वेळापत्रक तयार केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनापूर्वी काही अभ्यास करण्यास दिला जातो. 

इंटरनेटवर मिळणारे ॲप डाऊनलोड करून हे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी शिक्षकांना शाळेत यावे लागत नाही. तेही घरातूनच विद्यार्थ्यांचा तास घेतात.  विद्यार्थी आपापल्या घरातून मोबाईल, लॅपटॉपद्वारे वर्गात सहभागी होत आहेत. अशा प्रकारे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न शिक्षण क्षेत्र करत आहे. दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्य नीलम चक्रवर्ती म्हणाल्या, की सध्या विद्यार्थी शाळेतील वातावरण खऱ्या ‘मिस’ करीत आहेत. परंतु, ऑनलाइन वर्ग सुरू झाल्याने ते उत्साहात आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E Learning Class for CBSE Student