डिंगोरे येथे १४ शाळांना ई-लर्निंग संच
ओतूर, ता. २२ ः डिंगोरे (ता. जुन्नर) व परिसरात सह्याद्री इंडस्ट्री, रोटरी क्लब नारायणगाव हायवे आणि रोटरी क्लब फारिस्ट पुणे यांच्या वतीने १४ शाळांना अत्याधुनिक ई-लर्निंग संच प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे.
या ई-लर्निंग संचाचे उद्घाटन पुण्यातील रोटेरियन पंकज पटेल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धनंजय राजूरकर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष डॉ. उत्तम घोरपडे होते.
प्रकल्प संचालिका मंदाकिनी दांगट यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे सचिव हनुमंत भंडारी, डॉ. शिवाजी टाकळकर, डॉ. हेमलता गुळवे, डॉ. योगेश यादव, डॉ. नंदिनी घाडगे, बाळासाहेब ढमाले, नितीन भुजबळ, रवींद्र वाजगे, अपेक्षा शिंदे तसेच रोटरी क्लब राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना ई लर्निंग संचाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. सूत्रसंचालन संतोष पाडेकर यांनी केले. तर आभार सीमा खिलारी यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

