
पुणे : ‘‘पूर्व प्राथमिक शाळा हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि तितकाच सुंदर टप्पा आहे. याच वयापासून मुलांच्या शिक्षणात सर्जनशीलतेवर भर द्यायला हवा,’’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ‘‘सर्जनशीलतेवर भर देणारी ‘कॅट्स’ शाळेची शिक्षणपद्धती स्तुत्य आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.