साथींच्या आजारांची पूर्वसूचना शक्‍य; शास्त्रज्ञांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पावसाळ्यात येणाऱ्या हिवताप (मलेरिया) आणि अतिसारासारख्या साथीच्या आजारांची पूर्वसूचना मिळण्यासाठी हवामानशास्त्रावर आधारित प्रणाली विकसित करणे शक्‍य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

पुणे - पावसाळ्यात येणाऱ्या हिवताप (मलेरिया) आणि अतिसारासारख्या साथीच्या आजारांची पूर्वसूचना मिळण्यासाठी हवामानशास्त्रावर आधारित प्रणाली विकसित करणे शक्‍य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थानिक हवामानात होणारे बदल हे प्रामुख्याने आजारांचे प्रमुख कारण असते. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पावसाळ्यात स्थानिक हवामानातील बदलांमुळे हिवताप आणि अतिसारासारख्या आजारांमध्ये होणाऱ्या वाढीचा अभ्यास करण्यात आला आहे. यासंबंधीचा शोधनिबंध "नेचर सायंटिफिक रिपोर्ट'मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांचे पूर्व अंदाज काढणे शक्‍य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक शहराची भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती वेगळी असते. जर त्या भागातील हवामान आणि आरोग्याचा डेटा एकत्र केला, तर विविध शहरांसाठी दोन ते तीन आठवडे अगोदर हा पूर्वानुमान वर्तविणे शक्‍य होईल. या अभ्यासात अतुल कुमार सहाय, राजू मंडल, सुश्‍मिता जोसेफ, शुभायू शाह, प्रदीप आवटी, सोमनाथ दत्ता आदींचा सहभाग होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवामानाच्या अंदाजानुसार प्राप्त माहितीच्या आधारावर 2 ते 3 आठवड्यापूर्वीच या पावसाळी आजारांची कल्पना दिली जाऊ शकते. त्यामुळे आरोग्य खात्यालाही पूर्वतयारी करणे सोपे होईल. तसेच सामान्य नागरिकांना देखील योग्य ती खबरदारी घेता येईल. 
- डॉ. अतुल कुमार सहाय, शास्त्रज्ञ, आयआयटीएम 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहवालातील निष्कर्ष 
- पुण्याच्या तुलनेत नागपूर येथे हिवतापाचे प्रमाण जास्त 
- मॉन्सूनच्या चारही महिन्यांत पुण्यातील अतिसाराचे प्रमाण जास्त 
- नागपूरमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिसाराच्या प्रमाणात वाढ 
- स्थानिक वातावरणाचा प्रभाव थेट आजारांच्या प्रसारावर 
- हवामान-आरोग्य यांच्या एकत्रित डेटाच्या आधारावर पूर्वसूचना प्रणाली शक्‍य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Early warning of epidemics such as malaria and diarrhea in the rainy season

Tags
टॉपिकस
Topic Tags: