Nutritious-diet
Nutritious-diet

क्व्यारंटाइनमध्ये घ्या पौष्टीक आहार; जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसची भीती सर्व जगात पसरली आहे. अनेक देशात या विषाणूंनी हातपाय पसरले आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या आजाराच्या साथीवर मात करायची असेल तर घरातच थांबणे, अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर न पडणे आणि मुख्य म्हणजे प्रतिकारशक्ती वाढविणे हाच उपाय सध्या आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरात एकांतवासात असताना काय आहार घ्यावा, याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे खावे 

  • घरात तयार केलेले ताजे अन्न 
  • असे अन्न आरोग्यदायी व पौष्टिक असावे
  • फायबरयुक्त भाज्या, फळे, डाळी
  • पचनास हलके असलेले ओट्स, ब्राउन पास्ता, ब्राउन राईस, गव्हाचा ब्रेड 
  • जेवणानंतर गूळ किंवा बडीशेप खावी. यामुळे अन्न पचविणे सोपे होईल

हे खाणे टाळावे

  • रिफाईंड धान्ये जसे मैदा, पांढरा पास्ता, पांढरा तांदूळ आणि पांढरा ब्रेड
  • पॅकबंद, हवाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत
  • लाल आणि चरबीयुक्त मांस
  • लोणी, फॅटने परिपूर्ण दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ
  • चहा आणि कॉफीचे सेवन जास्त करू नये 
  • पाम तेल, नारळाच्या तेलाचे सेवन कमी करावे
  • अल्कोहोलमुळे कोरोनाचा धोका वाढतो. त्यामुळे दारूचे सेवन करू नये

पेय

  • शरीरात पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ८-९ ग्लास पाणी प्यावे
  • एक ग्लास लिंबूपाणी, एक ग्लास ज्यूस किंवा एक ग्लास दूध प्यावे
  • काकडी, गाजर आदी भाज्यांचा समावेश आहारात करावा
  • ‘क’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त फळे खावीत

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com