esakal | पुणे शहरात भाडेतत्वावर ई -बाईक्स धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

Ebikes

पुणे शहरात भाडेतत्वावर ई -बाईक्स धावणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या वर्षभरापासून शहरात भाडे तत्त्वावर ई बाईक्स (EBikes) धावणार (Run) अशी चर्चा सुरू असताना अखेर या प्रस्तावास महापालिकेच्या मुख्यसभेत मंजुरी (Permission) देण्यात आली. यामध्ये ई बाईक पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना बाईक चार्जिंगसाठी शहरात रस्त्याच्या कडेला ५०० ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Ebikes will be Run on Lease Basis in Pune City)

शहरात धावणाऱ्या लाखो वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषण होते, यास आळा घालण्यासाठी सीएनजी, ई बसेस धावत आहेत. आता ई बाईक्स धावणार आहेत. विट्रो मोटर्स प्रा. लि. आणि ईमॅट्रीक्स माईल या कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे़. शहरात विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावर ई बाईक पुरविणे तसेच या कंपनीला शहरात ५०० विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध द्यावी असा प्रस्ताव जून २०२० मध्ये शहर सुधारणा समितीने मंजूर केला होता. जुलै २०२० मध्ये स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेऊन मान्यता दिली. डिसेंबर २०२० च्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर हा विषय आलेला असताना या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे ई बाईक्स पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ईमॅट्रीक्स माईल या कंपनीचाही समावेश केला.

त्यास मान्यता मिळेल असे अपेक्षीत होते. मात्र, हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. अखेर आज (मंगळवारी) झालेल्या मुख्यसभेत असलेल्या मान्यता देण्यात आली.

loading image