पर्यावरण पूरक गणपती बनवा कार्यशाळा

पर्यावरण पूरक गणपती बनवा कार्यशाळा
Published on

NIE चा लोगो वापरावा
लोगो ः आले गणराय
.........
पर्यावरणपूरक गणपती बनवा कार्यशाळा
‘एनआयई’चा उपक्रम ः घरच्या प्रतिष्ठापनेसाठी स्वतःच बनवा मूर्ती
................
अहिल्यानगर, ता. ३१ ः सकाळ ‘एनआयई’तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (ता. ६ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता हिंद सेवा मंडळाचे मेहेर इंग्लिश स्कूल (पटवर्धन चौक) येथे ‘पर्यावरणपूरक गणपती बनवा’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करून तिची घरी प्रतिष्ठापना करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

एनआयई सभासदांसाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी नाममात्र २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ही कार्यशाळा रोटरी क्लब सेंटर ऑफ अहिल्यानगर यांनी प्रायोजित केली आहे. डॉ. सुज्योत सैंदाणे हे या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व बन्सी महाराज मिठाईवाले यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा होत आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी बनवायची, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मूर्ती साकारायची आहे.

एनआयईच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, संवाद कौशल्य तसेच विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विविध विषयांवर संवाद साधला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार लेखन व चित्राद्वारे मांडण्यास प्रवृत्त केले जाते. वर्षभरात खास अंक प्रकाशित केले जातात. या कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
...........
इन्फो

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी साहित्य

शाडू माती कार्यशाळेत आयोजकांकडून दिली जाईल. मात्र, वहीचा जुना पुठ्ठा, छोटी वाटी, स्केचपेन, पट्टी, कटर, बॉलपेन, पेन्सिल, ब्रश, जुनी रिफील, जुने कापड, टूथपिक, आइस्क्रीम स्टिक, पाणी आदी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे.
...................
इन्फो

कार्यशाळा केव्हा, कुठे?

तारीख ः ६ सप्टेंबर २०२६
वेळ ः सकाळी १० वाजता
स्थळ ः मेहेर इंग्लिश स्कूल, पटवर्धन चौक, अहिल्यानगर
नावनोंदणी संपर्क ः शिल्पा धोपावकर : ९८९०६११२९१, शिवामृत सलगरे : ९५९५०१०७०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com