Wedding Ceremony : लग्न समारंभाचे स्वरूप बदलले, परंपरा मात्र कायम; निसर्गरम्य वातावरण, पर्यावरणपूरक समारंभाकडे कल

बदलत्या काळानुसार लग्न समारंभात अनेक नवनवीन गोष्टी समाविष्ट झाल्या.
Marriage Event
Marriage Eventsakal
Updated on

शिवाजीनगर - बदलत्या काळानुसार लग्न समारंभात अनेक नवनवीन गोष्टी समाविष्ट झाल्या मात्र, नवरदेवाचा कान पिळणे, बूट पळवणे, करवला, करवलीचे , गळ्यात हार घालताना नवरा, नवरीला उचलणे, हळद लावणे या परंपरा अजूनही कायम टिकूण आहेत.

पूर्वी लग्नकार्य म्हटले की, पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच लगबघ सुरू होयची, प्रत्येकाला अपापली कामे विभागून दिली जात होती. घरात उत्साहाचे व खेळीमेळीचे वातावरण राहत होते. आत्या, मामा, मामी, काका, काकू हे सगळेजण स्वता:च्या घरातील कामे थांबवून उत्साहाने लग्नकार्यात सहभागी रहायचे.

वाढते शहरीकरण, राहण्यासाठी सुरु झालेली फ्लॅट पध्दत, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबाचे झालेले विभाजन अशा विविध कारणांनी घरासमोरील मंडपाचे स्थालांतर मंगलकार्यालयात झाले. नियोजन करणाऱ्या पाहुणे मंडळींची जागा इव्हेंट व्यवस्थापकाकडे आली, त्यामुळे आता घरातील मंडळींना कपडे, सोनं, आणि लग्न कार्यात जेवण कोणते हवे?

फक्त ऐवढाच विचार करणे बाकी राहिले आहे! अनेक नवरा, नवरी देश, विदेशात नोकरी, व्यवसाय करतात, तिथूनच इव्हेंट कंपनीबरोबर व्हॅाटस्अॅप किंवा झूम मीटिंग घेऊन, लग्न समारंभाचे नियोजन करत आहेत. त्यामुळे अनेक पाहुणे मंडळींच्या थेट लग्नकार्यातच भेटी होतात.

'गर्दीच्या ऐवजी निसर्गाच्या सानिध्यात लग्न, साखरपुडा असे शुभकार्य करण्यास नागरिक पसंती दर्शवतात. अनेक समारंभात पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केला जातो. सध्या लग्न समारंभाचे मुहूर्त असल्याने शहराच्या बाहेर, निसर्गाच्या सानिध्यात शुभकार्य करण्यास नागरिक पसंती देत आहेत. जागतिकीकरण वाढले असले तरी संस्कृती, परंपरा, पर्यावरणाविषयी जागरुकता वाढते आहे,' असे सनी’ज वर्ल्ड चेअरमन, सनी निम्हण यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक व पारंपरिक लग्न समारंभ

अनावश्यक खर्च टाळणे, ठराविक पाहुण्यांना बोलवणे, सोपी वेशभूषा, मंगल कार्यालय ऐवजी पारंपरिक अथवा निसर्गरम्य ठिकाण निवडणे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसलेल्या नवनवीन पध्दतीचा अवलंब करीत असताना, अनेकांचा पारंपरिक व पर्यावरणपूरक पध्दतीनेच लग्न करण्याकडे कल आहे.

यामध्ये केळींच्या पानाचा वापर, झेडू, शेवंती, निशिगंधा या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे वातारवरण प्रसंन्न राहते. त्याच बरोबर इतरही पध्दतीही आवलंबल्या जातात, यामध्ये राजेशाही पॅलेस तयार करणे, विशिष्ठ थीम निवडून लग्नाची सजावट केली जाते.

'निसर्ग आणि पर्यावरणाशी नाते जोडून, लग्न समारंभाच्या बाबतीत सामाजिक जाणीव ठेवून समाजात एक सकारात्मक बदल घडतोय. नवरा, नवरी चांगले पैसे कमवत असतील तर, त्यांच्या लग्नाचा खर्च आई, वडीलांना करून देत नाहीत तर ते स्वतःच करतात. पूर्वी पंधरा ते वीस दिवस चालणारा लग्न समारंभ आता दोन दिवसात संपन्न होतो मात्र, उत्साह आणि परंपरा अजूनही तेवढीच टिकूण आहे.

- स्वाती पाटील, मिराकी इव्हेंटस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com