अर्थमंत्री पत्रकार परिषद

अर्थमंत्री पत्रकार परिषद

Published on

विकासाची गती कायम राखणारा अर्थसंकल्प

निर्मला सीतारामन : उत्पादकता वाढ, रोजगार निर्मितीसाठी सुधारणा

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ : ‘‘यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेला मार्ग दाखविणारा आणि विकासाला चालना देणारा आहे,’’ असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. तसेच, उत्पादकता वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने या सुधारणा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्प सादरीकरणानंतर अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीतारामन म्हणाल्या, ‘‘सरकार सुधारणांचा मार्ग पुढे चालू ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. विकासाची गती कायम राहील. यंदा भांडवली खर्चात १२.२ लाख कोटी रुपयांची तरतूद असून हे प्रमाण जीडीपीच्या ४.४ टक्के आहे. मागील दहा वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण आहे. पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये वितरणाच्या ‘शहर आर्थिक क्षेत्र’ ही संकल्पना अर्थसंकल्पात मांडण्यात आली असून श्रेणी २ आणि श्रेणी ३ शहरांवर यात सर्वाधिक भर आहे. दुर्मिळ खनिजांबाबत बाह्य देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांना जोडणारा हा कॉरिडॉर असेल.’’
पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सवर लक्ष केंद्रित करताना पूर्व भारतातील दानकुनी (पश्चिम बंगाल) ते पश्चिमेकडील सुरत (गुजरात) या दोन ठिकाणांना जोडणारा मालवाहतूक कॉरिडॉर २० नवीन राष्ट्रीय जलमार्गांच्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला.
अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडूसारख्या आगामी निवडणुका असलेल्या राज्यांवर विशेष भर का दिला गेला नाही असे विचारले असता सीतारामन म्हणाल्या, ‘‘सरकारला कोणत्याही प्रकारे टीकेचा सामना करावा लागतो. निवडणूक होणाऱ्या आणि न होणाऱ्या राज्यांचाही अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे.’’

राहुल गांधींच्या टीकेची खिल्ली
अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचे सांगताना अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पावरील विरोधकांच्या टीकेची खिल्ली उडवली. टीका नाकारली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प देशासमोरील खऱ्या संकटाकडे दुर्लक्ष करणारा असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. त्याचा समाचार घेताना सीतारामन यांनी पलटवार केला. ‘‘त्यांना (राहुल गांधींना) कोणत्या सुधारणा हव्या आहेत हे समजत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आणि तिचे मूलभूत घटक मजबूत आहेत. आपल्या अनेक क्षेत्रांना जागतिक अनिश्चिततेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी, कापडांसाठी, चर्मोद्योग क्षेत्रासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या लोकांसाठी, त्यांच्या फायद्यासाठी, अगदी शेतकऱ्यांसाठी आणि मूल्यवर्धनासाठी, महिला उद्योजकांसाठी, स्वयं-मदत उद्योजकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत.
बाह्य अस्थिरतेमुळे सर्वसामान्यांवर परिणाम होऊ नये यासाठीचे हे मार्ग आहेत. राजकीय टीका स्वागतार्ह आहे, परंतु तथ्यांवर आधारित टीकांनाच मी उत्तर देणार आहे,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com