esakal | आर्थिक संकटावर करा नियोजनाने मात; अर्थतज्ज्ञांचा उद्योजकांना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Money

काही महत्त्वाच्या बाबी  

  • खर्च कमी करून प्राधान्यक्रम ठरवा 
  • उपलब्ध गंगाजळीवर जास्तीत जास्त दिवसांचे नियोजन करा 
  • ग्राहकांशी मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात राहा 
  • सध्या असलेला माल ऑनलाइनद्वारे विकण्याचा प्रयत्न करा 
  • उद्योजकांना कर भरण्यासाठी सरकार वेळ देईल 
  • कर्जाचे ईएमआय भरण्यास सरकार, बॅंकांना सवलत द्यावी लागेल 
  • छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी मोठ्यांनी पुढाकार घ्यावा.
  • आपत्तीचा हा अनुभव लक्षात घेऊन पुढे असा प्रसंग आल्यास तयार राहा.

आर्थिक संकटावर करा नियोजनाने मात; अर्थतज्ज्ञांचा उद्योजकांना सल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक नियोजन हे दैनंदिन जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. ‘कोरोना’ने प्रथम आरोग्यावर हल्ला चढविला त्यामुळे शैक्षणिक काम थांबवावे लागले. दैनंदिन व्यवहार बंद झाल्याने व्यावसायिकांसह नोकरदार आणि उद्योजकांवरही आर्थिक दुष्परिणाम जाणवण्याची शक्‍यता आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांपासून नोकरदारापर्यंत सर्वांना नव्याने नियोजन करावे लागणार आहे. म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीत आपले नियोजन काळजीपूर्वक करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञ देत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छोट्या, मोठ्या व्यावसायिकांनी परिस्थिती मान्य केली आहे. त्यामुळे ते सरकारी, वैद्यकीय यंत्रणेला सहकार्य करत आहेत. या सर्वांनीच पुढच्या काही दिवसांचे खर्चाचे नियोजन केलेले असते. मात्र, दैनंदिन उत्पन्न बंद झाल्यास मोठे संकट उभे राहाते. दुकान बंद झाल्यास कामगारांना पगार देता येत नाहीत. हॉटेल मालकांची तारांबळ होते. काही व्यावसायिकांचे ग्राहक तुटण्याची शक्‍यता असते. ही साखळी नव्याने उभी करताना भविष्यात त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी पूर्वनियोजन करावे, असा सल्ला अर्थतज्ज्ञ चकोर गांधी यांनी दिला. साधारण महिनाभर आपण तग धरून राहू शकू, असे नियोजन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

loading image