ED Raid
sakal
पुणे - गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे अवैध मार्गाने स्त्रीबीज (ह्युमन एग्ज) काढून घेणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ‘ईडी’च्या मुंबई विभागीय कार्यालयाने ठाणे, बारामती आणि नाशिकमधील रुग्णालये आणि टेस्ट ट्यूब बेबी (आयव्हीएफ) केंद्रांसह १० ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. याची पाळेमुळे अन्य शहरातही असल्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.