Nawab Malik | पुण्यात ईडीचे 7 छापे; नवाब मलिकांच्या खात्यासंबंधी चौकशीला वेग? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ed has managed to convict only in nine cases in decade

पुण्यात ईडीचे 7 छापे; नवाब मलिकांच्या खात्यासंबंधी चौकशीला वेग?

वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात आज सात ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. मात्र पुण्यात नेमके कोणत्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्रालयांतर्गत येत असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे यांच्याकडे हे मंत्रालय आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत एनसीबीच्या कामकाजावर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तेव्हापासून मलिक चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर देखील काही आरोप केले आहेत. त्यानंतर काही तासांतच वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.

पुणे पोलिसांनी या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोघांना अटक केली होती. या अधिकाऱ्यांवर पदावर असताना 7.76 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या अखत्यारीत घेतला आहे.

यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. त्यांनी हा प्रकार वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घडला नसल्याचं सांगितलं. तसेच अन्य काही ठिकाणी छापे पडल्याचं त्यांनी मान्य केलंय.

loading image
go to top