
पुणे शहर, जिल्ह्यातील ३८ शाळांचा स्वच्छ विद्यालय पुरस्काराने गौरव
पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण ३८ शाळांना जिल्ह्यास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार (Swachh Vidyalaya Puraskar) जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्या शाळांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते बुधवारी (ता.२०) झेडपीत या पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्र पुरस्कृत 'स्वच्छ भारत , स्वच्छ विद्यालय " या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. त्यानंतर बुधवारी (ता.२०) विजेत्या शाळांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्या शोभा खंदारे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रभाकर क्षीरसागर, प्रा. नामदेव शेंडकर आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पुरस्कार विजेत्या आठ शाळा पुढीलप्रमाणे
पुणे महापालिकेची जी. एस. मोझे माध्यमिक विद्यालय, येरवडा, विद्यांकूर शाळा, येरवडा, जिल्हा परिषद शाळा जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, शिवनेरी स्कूल, खानापूर, ता. जुन्नर, गुंजाळवाडी जिल्हा परिषद शाळा, या. जुन्नर, जिल्हा परिषद शाळा, राजूरी नं४, ता. जुन्नर, जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल, आळेफाटा, ता. जुन्नर आणि भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली, ता. हवेली.
Web Title: Education 38 Schools Of Pune City District Honored With Swachh Vidyalaya Puraskar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..