

Admission
- प्रज्वल रामटेके
पुणे - राज्यातील विनाअनुदानित (खासगी) पुर्व प्राथमिक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेतील मनमानी आणि पालकांकडून होणारी अतिरिक्त शुल्काची वसुली रोखण्यासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कठोर पावले उचलली आहेत. प्रवेशासाठी देणगी, मुलाखती आणि अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीला बंदी घालण्यासह विशिष्ट दुकानातून पुस्तके व गणवेश खरेदी करण्याची सक्ती करण्यासही मनाई करण्यात आली आहे.