Teachers Recruitment : राज्यातील १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता
education department issued instructions to ceo respective zilla parishads regarding recruitment of teachers 13 districts
education department issued instructions to ceo respective zilla parishads regarding recruitment of teachers 13 districts esakal

पुणे : शिक्षण विभागाने राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार आता लवकरच पुण्यासह नगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, ठाणे आणि यवतमाळ या १३ जिल्ह्यांतील शिक्षक भरती प्रक्रियेला वेग मिळणार आहे. ‘‘अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.

अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे,’’ अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे.

आता पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता मान्यता दिली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे.

ही तरतूद लक्षात घेता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (टेट) -२०२२’ चाचणी दिलेल्या ‘एसटी-पेसा’ उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. टेट परीक्षा-२०२२ दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांचा संबंधित जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी,

असे मांढरे यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात आल्याचेही मांढरे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com