
सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) जाहीर केलं आहे. आता या परीक्षा १६ ते २४ मे २०२५ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.