'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 18 February 2021

मी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माझी वारंवार चर्चा होते. मी त्यांचा लाडका मंत्री आहे, पण राज्य सरकार आणि त्यांच्यातील वाद सोडवण्या इतका मोठा नेता मी नाही; असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

पुणे - मी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माझी वारंवार चर्चा होते. मी त्यांचा लाडका मंत्री आहे, पण राज्य सरकार आणि त्यांच्यातील वाद सोडवण्या इतका मोठा नेता मी नाही; असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबाबत सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, "तसा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महा विकास आघाडी सरकार यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे ते राज्य सरकारला काही पत्र लिहीत असतात आणि राज्य सरकार लोकशाही प्रमाणे त्यांना पत्र लिहून उत्तर देत असतं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे, तर उच्च मंत्र शिक्षण मंत्री म्हणून माझा त्याच्या कायम संवाद आहे. राज्यपालांच्या मी लाडका मंत्री आहे. पण राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद सोडविण्या इतका मी मोठा राजकीय नेता नाही, असे सामंत यांनी सांगितले.

पूजा चव्हाणवरून सेनेत दोन गट नाहीत
शिवसेना हा उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा आदेश शिवसैनिक किंवा मंत्र्याला मान्यच करावा लागतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेमध्ये कोणतीही गट नाहीत, जो आदेश देईल तो मान्य करावाच लागेल. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे,  पोलीस महासंचालकांच्या पातळीवर माहिती घेतली जात आहे, त्यामुळे आपल्याच सहकार्याबद्दल काहीतरी बोलणे योग्य नाही. राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील असे सामंत यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Minister Uday Samant on governor bhagat singh koshyari and mahavikas Aghadi controversy