शिक्षणमंत्री उदय सामंत रानडे इन्स्टिट्यूटला देणार भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणमंत्री उदय सामंत रानडे इन्स्टिट्यूटला देणार भेट

शिक्षणमंत्री उदय सामंत रानडे इन्स्टिट्यूटला देणार भेट

पुणे : ''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Fule Pune Univercity) पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील नामांकित संस्था असलेल्या रानडे इन्स्टिट्यूट'चे (Ranade Institute) स्थलांतर करू नये'', अशी मागणी युवासेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना केली होती. ही मागणी लक्षात शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून शनिवारी (ता.१४) पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथे भेट देणार असल्याची माहिती दिली.

पुणे विद्यापीठाचे संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाला(Department of Communication and Journalism) अर्थात रानडे इन्स्टिट्यूटला माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात विलीन करुन डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नालिझम अँड मीडिया स्टडीज, असा नवा विभाग तयार करण्यात येण्याची प्रक्रिया प्राथमिक स्वरुपात सुरू आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर माजी विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रानडे इन्स्टिट्यूट बचाव समितीच्या सदस्यांनी डॉ. करमळकर यांची भेट घेऊन, प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. प्रस्ताव मागे न घेतल्यास, आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात देण्यात आला.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. या भेटीत काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Education Minister Uday Samant Will Give Visit On 14th August To Ranade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ranade Institute
go to top