जिल्हा परिषद शाळेतील सुविचार नगरी

‘फलक की झलक, सबसे अलग’ या तत्त्वावर आधारित सुविचार दर्शन या उच्च प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी व पालकांना सतत घडतं.
education news zilla Parishad school good thoughts iso certify teacher class 1 to 8 school
education news zilla Parishad school good thoughts iso certify teacher class 1 to 8 school sakal
Updated on
Summary

‘फलक की झलक, सबसे अलग’ या तत्त्वावर आधारित सुविचार दर्शन या उच्च प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी व पालकांना सतत घडतं. सहायक शिक्षक अशोक पाटील म्हणाले, ‘‘आमच्या शाळेत २१० मुलं-मुली आहेत.

Summary

‘फलक की झलक, सबसे अलग’ या तत्त्वावर आधारित सुविचार दर्शन या उच्च प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी व पालकांना सतत घडतं. सहायक शिक्षक अशोक पाटील म्हणाले, ‘‘आमच्या शाळेत २१० मुलं-मुली आहेत. मुख्याध्यापक सतीश सावंत यांच्या शैक्षणिक प्रयोगांमुळे शाळेची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढत गेली आहे. आयएसओ प्रमाणपत्र मिळालेल्या आमच्या या शाळेत सुविचार, स्वच्छता व आरोग्याबद्दल सूचना तसंच जीवनमूल्यं लिहिलेले फलक अगदी खास आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजीतील हे तीस फलक सध्या विद्यार्थ्यांच्या हातून शाळेच्या बागेत लावण्यात आले आहेत. कधी ते हातात घेऊन विद्यार्थी उत्साहाने मिरवणूक काढतात, कधी ते धरून गोलाकार उभे राहतात.

'घाबरू नका, नेतृत्व करा, आव्हान स्वीकारा, सामना द्या,’ ‘ हात वारंवार धुवावेत,’ ‘मित्र थोडेच, पण चांगले असावेत,’ ‘शेती विकायची नसते, राखायची असते,’ ‘अपनी बुराई हमेशा सुनें और अपनी तारीफ कभी ना सुनें,’ ‘याद रखिए, सबसे बड़ा अपराध अन्याय सहना और गलत के साथ समझौता करना है,’ ‘Happiness is enjoying the little things,’ ‘Good things happen to good people,’ यांसारख्या फलकांचं वाचन वरचेवर नकळतपणे घडतं. यातून सकारात्मकता संचारत राहते.’’

पाटील यांनी असंही सांगितलं की, जायकवाडी धरणामुळे घरं गेलेल्या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी हे गाव वसलं. बहुतांश त्यांचीच मुलं आमचे विद्यार्थी आहेत. दहा वर्षांपूर्वी शाळा सुरू झाली तेव्हा सात गुंठे जागेत होती. शासनाच्या या जागेत गुरं बांधणं वगैरे कारणांनी काहीजणांनी अतिक्रमण केलेलं होतं. सावंत सरांच्या प्रयत्नांनी ते दूर झालं व चाळीस गुंठ्यांचा परिसर शाळेला मिळाला. पैकी सुमारे वीस गुंठ्यांत बाग उभारली आहे.

येथील एक भाग ‘ऑक्सिजन झोन’ म्हणून विकसित करताना त्यात जास्तीत जास्त तुळस लावलेली आहे. संपूर्ण बागेतील सत्तर प्रकारच्या झाडांची वनस्पतीशास्त्रीय नावं, कूळ व औषधी उपयोग विज्ञान शिक्षक रवींद्र लाटे यांनी संकलित केले आहेत. तुळशीदास जाधव, शकुंतला विभूते आणि मी आपापले विषय शिकवताना अधूनमधून शाळेतील सुविचार पाट्यांचाही वापर करत असतो.

पैठण तालुक्यातील तारू, पिंपळवाडी या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत आगळीवेगळी सुविचार नगरी आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीत लिहिलेले सुविचार, मौलिक सूचना आणि जीवनमूल्यं लिहिलेल्या पाट्या शाळेच्या परिसरात बघायला मिळतात. फिरताना, खेळताना नजरेस पडणारे हे सकारात्मक विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबले जातात.

- नीला शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com