प्राचार्य डॉ. अनिल निघोट यांच्या आठ शैक्षणिक ग्रंथांचे प्रकाशन
मंचर, ता. ४ : येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात प्राचार्य डॉ. अनिल नारायण निघोट लिखित आठ शैक्षणिक संदर्भग्रंथांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. एम. ए. खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निघोट यांनी ‘ॲडव्हान्स्ड एज्युकेशनल सायकोलॉजी : लर्निंग अँड टीचिंग’, ‘मॉडर्न अॅडव्हान्स्ड एज्युकेशनल मॅनेजमेंट’, ‘भावनिक बुद्धिमत्ता आणि सहकार्यात्मक अध्ययन’, ‘इंडियन नॉलेज सिस्टीम इन एज्युकेशन’, ‘असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग’, ‘अध्ययन आणि अध्यापन’, ‘अध्ययनासाठी मूल्यमापन’ आदी ग्रंथांची निर्मिती केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर हे ग्रंथ मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
प्रकाशन सोहळा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागप्रमुख प्रा. डॉ. गीता शिंदे, प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य सुनील सालके, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य नितीन बाणखेले, पंचायत समिती सदस्य शिवाजीराव निघोट आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी शिक्षकवृंद, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुरेखा निघोट यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. ए. झावरे व प्रा. जी. डी. मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ बी. पी. गार्डी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

