‘स्कूल चले हम’ अभियानांतर्गत उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात

‘स्कूल चले हम’ अभियानांतर्गत उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात
Published on

JEU26B08220
बादोले बु. येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.

बादोले बु. येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
अक्कलकोट ः शिवशाही फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्कूल चले हम’ अभियानांतर्गत बादोले बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवशाही फाउंडेशन भारतचे संस्थापक-अध्यक्ष बाळाराम रखमाजी माडकर यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, माजी सरपंच बाजीराव खरात, विठ्ठल खरात, पांडुरंग सलगरे, विठ्ठल कत्ते, सिद्धाराम बिराजदार, भीमा कत्ते, सिकंदर भाईजान उपस्थित होते.
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. यंदा या अभियानाचे नववे वर्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com