आत्मनिर्भर बनण्यासाठी दिव्यांग विद्यार्थीनीला शैक्षणिक मदत

स्वयंसेवी संस्थेंनी घेतला पुढाकार
Educational help for disabled students to become self-reliant pune
Educational help for disabled students to become self-reliant pune sakal

कोथरुड : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ईनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट व सदगुरू सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आरती जयस्वाल या दृष्टी बाधित दिव्यांग विद्यार्थ्यीनीला शैक्षणिक फी साठी आर्थिक मदत करण्यात आली. जयस्वाल ही 90% दृष्टी बाधित आहे, आणि तिला आई वडील नाही. मुळची मुंबईची असल्यामुळे ती पुण्यामध्ये एका वसतीगृहात ती राहते आणि बसने प्रवास करून गरवारे कॉलेजला या कोर्सचे शिक्षण घेत आहे. ब्युटी आणि वेलनेस हा अभ्यासक्र्म पुर्ण करुन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे तीचे स्वप्न होते.

महाविद्यालयाची फी भरण्यासाठी तीला सहकार्याची आवश्यकता होती. तीची गरज लक्षात घेवून संस्थेने १५६५५ रूपये शैक्षणिक प्रवेश फी गरवारे महाविद्यालयात भरले. यावेळी ईटन कंपनीचे मिलिंद वैद्य, मयुर हगवणे, किरण मोहोळ, सचिन म्हसे सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, नवलोबा प्रतिष्ठान चे मेजर विपुल पाटील, अमित सुतार, विकास मोहोळ, अनिल बोराटे, शितल सोनवणे आणि अमोल शिनगारे उपस्थित होते अमोल शिनगारे म्हणाले की, डॉ. आंबेडकर म्हणतात की, शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. या विद्यार्थीनीचा शिक्षण घेण्यासाठी संघर्ष सुरु होता. तीची समस्या दूर व्हावी यासाठी शैक्षणिक फी भरुन तीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com